Advertisement
पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी चिंचवड दौरा अनेक अर्थानं महत्त्वपूर्ण ठरला. पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीचे राजकीय अर्थ निघणार असल्यानं ही सदिच्छा भेट असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवर्जुन सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनसोडे यांचा भगवी शाल घालून केलेला सत्कार बरंच काही सांगून गेला. अर्थात आमदार बनसोडे यांनी शिवसेना प्रवेशाबाबतच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली. राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे दोनदा निवडून आले आहेत. शिवसेनेत आल्यास ते पक्षाचा दलित चेहरा ठरू शकतात आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तिय आहेत.
