Advertisement
मुंबई : मुंबई महापालिकेवर एक जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्याचं नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहे. मात्र, या मोर्चापूर्वीच भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर आणि मलबार हिल परिसरात बॅनर झळकले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. या बॅनरवर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे.
'ओळखा पाहून कोण? मुंबईची करून लुटमार कोणीतरी एक झालंय मालदार, मांडलाय मुंबईचा बाजार सत्तेबाहेर गेल्यामुळे झालाय आता बेजार!' असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरवर भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे. या बॅनरवर कोणाचही नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र या बॅनरचा रोख हा ठाकरे गटाकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
