Advertisement
पुणे : विधीमंडळ आणि संसद या दोन ठिकाणी स्त्रियांना आरक्षण द्यायची भूमिका घ्यायला हवी जर मोदीसाहेब भूमिका घेत असतील तर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ, असं थेट आव्हान पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिलं आहे.
पाटण्यात विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. महिला आरक्षणावरुन थेट पंतप्रधान मोदी यांना पवार यांनी आव्हान दिलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, पाटण्याला एक बैठक झाली तेव्हा प्रधानमंत्री अमेरिकेत होते. ते कळल्यावर त्यांनी व्यक्तिगत हल्ले करायला सुरूवात केली. 13 आणि 14 जुलैला बंगलोरला सगळ्या पक्षाची बैठक होणार आहे. सिमल्यला अतिवृष्टी असल्याने निर्णय बदलला. सांप्रदायिक वातावरण तयार केलं जातंय त्याला सामोरं कसं जायचं याची चर्चा करणार आहे. काल पक्षाच्या चार बैठका झाल्या तिथे आग्रही मागणी झाली. महिलांना आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. यावेळी आपण राज्यात महिलांना आरक्षण दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे..
