Advertisement
पुणे : भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पाटण्यामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असंही पंतप्रधान म्हणाले.
मुलायम सिंग यांच्या मुलाचं भल करायचं असेल तर समाजवादी पार्टीला व्होट द्या. लालूंच्या मुलांचं भल करायचं असेल तर आरजेडीला मत द्या. शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, पण तुम्हाला तुमच्या मुलाचं भलं करायचं असेल तर मत भाजपला द्या,' असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे, याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वत: विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा उल्लेख त्यांनी केला, मी कधीही शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. मी कधी लोन घेतले नव्हते, मी त्या संस्थेचा सदस्य नव्हतो. याबाबत बोलणं कितपत ठिक आहे?', असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
