Advertisement
पुणे, 29 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील पुण्यातील बेपत्ता महिलांचा आकडेवारी सांगून गृहखात्याच्या कारभारावर संशय उपस्थितीत केला आहे. फडणवीसांनी इतर गप्पा मारण्यापेक्षा या महिलांचा शोध घ्यावा, असा सल्लावजा टोलाही लगावला.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य आणि फडणवीस यांनी मुलाखतीत केलेल्या आरोपाबद्दल पवारांनी प्रत्युत्तर दिलं.महाराष्ट्रात सरकार येऊन एक वर्ष झालं अनेक प्रश्न आहेत पण माझ्या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले, त्यांना लक्ष्य करणे या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत. मी अधिकृत माहिती मिळवली त्यामध्ये सगळ्या महापालिकांची माहिती मिळाली नाही. पण पुणे, ठाणे, सोलापूर इथली माहिती मिळाली. 23 जानेवारी ते 23 मे दरम्यान मुंबईतून 738 महिला बेपत्ता झाल्या आहेत. पुण्यात 937 महिला आणि मुले बेपत्ता झाले आहे. तर ठाण्यात 731 महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षांमध्ये 6 हजार 889 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीच्या गप्पा करण्यापेक्षा या महिलांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना कुटंबाच्या हवाली कसं करता येईल याचा शोध घेतला पाहिजे, असा सल्लावजा टोला शरद पवार यांनी लगावला.
