Advertisement
| पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या
सुचनेनुसार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पूर्वतयारी सुरू
करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार
नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्यासह जिल्ह्यातील 21 मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी 11 शहरी व 10 ग्रामीण मतदार संघ आहेत. याद्या अद्ययावत करताना अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. याद्या अद्ययावत करताना 80 वर्षावरील मतदारांचे सर्वेक्षण करावे, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. सध्या, आधुनिक सॉफ्टवेअर येत आहेत. त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी माहिती करुन घ्यावी. मतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये, स्थानिक संस्था याठिकाणी व्यवस्था करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. |
