#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T15:30:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मला जबाबदारीतून मुक्त करा; अजित पवारांची शरद पवारांसमोर मागणी

Advertisement


मुंबई 
विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा... अशी मागणी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांनी ही मागणी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. आमदारांच्या आग्रहाखातर विरोधी पक्षनेता झालो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुंबईत राष्ट्रवादीची अत्यंत महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांनी विविष विषयांवर अत्यंत परखडपणे भाष्य केले. 

राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही?  : राष्ट्रवादी पक्षाच्या हातात एकहाती सत्ता का नाही? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.  इतर नेत्यांपेक्षा शरद पवार उजवे आहेत. तरी पण कमी का पडलो. मुंबईत सर्वात कमी आपण आहोत. मुंबईत अद्याप अध्यक्ष नाही. मुंबईत पक्ष का वाढला नाही याचा देखील विचार केला पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.