#

Advertisement

Wednesday, June 7, 2023, June 07, 2023 WIB
Last Updated 2023-06-07T12:14:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कट्टर विरोधक नारायण राणे आणि दीपक केसरकर एकाच मंचावर

Advertisement


सिंधुदुर्ग : राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो.  सिंधुदुर्गात असाच एक राजकीय चमत्कार पाहायला मिळाला. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करणारे भाजप नेते नारायण राणे आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी हा राजकीय चमत्कार दाखवला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे हे दोन नेते चक्क एकाच मंचावर एकत्र आले. या दोघांना एकत्र पाहून राजकीय वर्तुळात वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात कधीकाळी या विस्तवही जात नव्हता. मात्र, आता बदलत्या राजकीय वातावरणात राणे-केसरकर युती झाल्याचं चित्र दिसत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले. सावंतवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तब्बल 110 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग हायवे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.