#

Advertisement

Tuesday, June 6, 2023, June 06, 2023 WIB
Last Updated 2023-06-06T12:23:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भागीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीला

Advertisement

पंढरपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. भागीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीला गेले आहेत. केसीआर यांनी भालकेंसाठी खास विमान पाठवलं आहे. भागीरथ भालके तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवलं. भागीरथ भालके 2024 मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे. 
भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून आले, पण भारत भालके यांचं निधन झालं. यानंतर पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली, या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पूत्र भागीरथ भालके यांना उमेदवारी दिली, पण यामध्ये भागीरथ भालके यांचा पराभव झाला. भाजप उमेदवार समाधान आवतडे यांनी ही पोटनिवडणूक जिंकली.