#

Advertisement

Tuesday, June 6, 2023, June 06, 2023 WIB
Last Updated 2023-06-06T12:32:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "मनसे" अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Advertisement

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता मनसेनं कबंर कसली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकीसाठी मनसेकडून खास प्लॅनची देखील आखणी करण्यात आली आहे. नव्या प्लॅननुसार आता मनसेकडून नाका तिथे शाखा उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून नाका तिथे शाखा मोहीम हाती घेण्यात आली आहे.  नाका नाक्यावर मनसे पदाधिकारी उपस्थित राहून लोकांशी संवाद साधणार आहेत. एका ठराविक वेळी मनसेचे पदाधिकारी नाक्यावरती उपस्थित असणार आहेत. लोकांचे विभागीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेकडून नाका तिथे शाखा मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.