#

Advertisement

Tuesday, June 20, 2023, June 20, 2023 WIB
Last Updated 2023-06-20T13:04:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ?

Advertisement

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय  राऊताच्या अडचणीत होणार वाढ होण्याची चिन्ह आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात सरकारतर्फे आज आयोग नेमले जाण्याची शक्यता आहे. निवृत्त न्यायादिशाची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर आज संजय शिरसाट यांनी पत्र लिहून मागणी केली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना मागील वर्षी ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. 5 महिने सुनावणीनंतर राऊत यांची जामिनीवर सुटका झाली होती.  5 महिने सुनावणीनंतर राऊत यांची जामिनीवर सुटका झाली होती. आज संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात दोषी अधिकारी, राजकीय व्यक्ती आणि बिल्डर यांनी संगनमत करून जो आर्थिक गैरव्यवहार केला आहे, त्यासंबंधीची सखोल चौकशी निवृत्त न्यायमूर्तीकडून 6 महिन्याच्या अवधीमध्ये चौकशी आयोग नेमून करावी, अशी मागणी शिरसाट यांनी केली.