Advertisement
अमरावती : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नेहमी चर्चा होते. विस्तारावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. प्रत्येकवेळी सरकारमधील मंत्र्यांना मंत्रीमंडळ विस्ताराविषयी विचारले असता लवकरच होणार एव्हढच उत्तर ऐकायला मिळते. आता आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असेल असं वाटतं होतं. दुसऱ्या फेरीत मंत्रिमंडळात निवड होईल असं वाटतं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराल वर्ष लागेल असं वाटतं नव्हत. विस्तार झाला नाही म्हणून नाराज नाही. सरकारने काही कामे चांगली केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी मी नाराज नाही. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं नाही, पुढचा विस्तार हा 2024 मध्ये होईल ती क्षमता या सरकारमध्ये नाही, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी दिला आहे.
