#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T10:44:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नंदी बैलवाला समाजातील महेंद्र गुजर ठरला 'कास्ट व्हॅलिडिटी' साधं जातप्रमाणपत्र मिळवणारा पहिला तरुण

Advertisement


नागपूर : गावो गाव भटकंती करत दारोदारी नंदी फिरवून मिळेल त्या भिक्षेवर आयुष्याची गुजराण करणाऱ्या सरोदा समाजातील एका तरुणाने शिक्षणासाठी बंड पुकारले आहे. पिढीजात दारोदारी नंदी फिरवण्याचा व्यवसाय न करता मला एक मोठा अधिकारी व्यायचं आहे असा दृढ निश्चय त्यानं केला. त्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू असून नागपुरातील महेंद्र गुजर यानं नुकतंच पदवीचं शिक्षण घेऊन वकिलीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे भटक्या विमुक्त जनजाती मधून येणाऱ्या सरोदा समाजातील 'कास्ट व्हॅलिडिटी' मिळणारा महेंद्र हा पहिलाच तरुण ठरला आहे.
महेंद्र गुजर हा नागपुरातील पारशिवणी तालुक्यात राहणारा सरोदा नंदी बैलवाला समाजातील तरुण आहे. त्याच्या घरी आई वडील, एक मोठा भाऊ व तीन बहिणी आहेत. वडील नंदी फिरवून भिक्षा मागतात. मिळणाऱ्या भिक्षेवरच महेंद्रचे घर चालते. महेंद्रच्या वडिलांनी या नंदीच्या भरवश्यावर तीन बहिणींचे लग्न केले. घरची परिस्तिथी पाहता मोठ्या भावाने शिक्षण सोडून दिले आणि वडिलांची साथ देत हा व्यवसाय सुरू केला. मात्र मी शिकलो पाहिजे यासाठी त्याचे मला सहकार्य असल्याची माहिती महेंद्र देतो.

असे मिळाले जातीचे प्रमाणपत्र :  माझ्या शिक्षणासाठी माझ्या भावाने मला मोठी साथ दिली आहे. आमच्या कुटुंबात जातीचा दाखला व इतर आवश्यक ते कागदपत्र जवळ नव्हते. अश्यात माझी परिस्थिती बघता मी ज्या वाचनालयात अभ्यास करत होतो तेथील काही लोकांचे मला मार्गदर्शन लाभले. जवळ आवश्यक ते कागदपत्र नसल्याने मी शासनाच्या योजनांचा आणि पुढील शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नव्हतो. अशावेळी परशिवनीचे माजी तहसीलदार यांनी मला मदत देऊ केली आणि रामटेक एसडीओ यांनी माझी बाजू समजून मला जातीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आता माझा आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महेंद्रने दिली.