#

Advertisement

Wednesday, June 21, 2023, June 21, 2023 WIB
Last Updated 2023-06-21T10:58:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात, 'मातोश्री'वरची सुरक्षाही केली कमी

Advertisement

मुंबई : ठाकरे कुटुंबियांच्या  सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.  उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी, तसंच पायलटही कमी केलाय. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे.