Advertisement
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार संजय शिरसाट यांनी बरोबर एक वर्षानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते.. मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते, असं विधान संजय शिरसाटांनी केलं आहे, तसंच राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालाय, अशी बोचरी टीका देखील शिरसाटांनी केली आहे.
'जयंत पाटील आमच्या संपर्कात नाहीत ते भाजपमध्ये जातील, निश्चित जातील, म्हणून आजकाल त्यांची स्टेटमेंट त्या पद्धतीने चालली आहेत. शिवसेनेची लोक कमळ या चिन्हावर निवडणूक लढतील, असं ते म्हणतात, तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही ज्योतिषी आहात का? कमळाबद्दल तुम्हाला का आपुलकी वाटते?', असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
