| मोहोळ :
मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे
यांच्या पत्नी स्व. अनुराधा यांचे अर्थात ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या आई
अनुराधा ढोबळे यांचे दि. 4 मे 2021 रोजी निधन झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या
कालावधीत पुन्हा याच दिवशी म्हणजे दि. 3 मे त्यांच्या आईच्या आई म्हणजेच आजी सौ.
विणाताई पुरूषोत्तम कसबे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. सोलापूर येथील खमीतकर
अपार्टमेंट येथील राहत्या घरात विणाताई यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. आई
गेल्याचे दु:ख ताजे असतानाच आजी गेल्याच्या दु:खाला सामोरे जावे लागत असल्याने ऍड.
कोमलताई यांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. आजी विणाताई यांचे संस्कार जसे आईवर
झाले तसेच लहानपणी आमच्यावरही झाले असल्याचे ऍड. कोमलताई यांनी सांगितले.
|