Advertisement
मुंबई : शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, अशी माहिती खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले होते. शिंदे यांनी मंत्री मंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तारातील सर्व अडचणी झाल्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची सुद्धा भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
