#

Advertisement

Friday, June 30, 2023, June 30, 2023 WIB
Last Updated 2023-06-30T11:52:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी आता माझी भूमिका घेतली... !

Advertisement



मुंबई : दूध पोळले आहे त्यामूळे ताक फुंकून प्यायचे,  2024ला इतिहास घडवायचा आहे, असं म्हणत पंकडा मुंडेंनी सूचक विधान केलं आहे. 2019 मध्ये जे विजयात आडवे आले त्यांना येत्या निवडणुकीत आडवे करू. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते करेल पण माझी मी भूमिका घेतली ती फायनल आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
बीड शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. 
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदींचे यशस्वी 9 वर्ष याची माहिती सांगायला मी मध्य प्रदेशमध्ये नक्षलग्रस्त भागात  गेले होते. त्यावेळी मी सुरक्षा नाकारली. कारण त्या ठिकाणीं मुंडे साहेबांची आठवण सांगणारे भेटले. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर यायचं, यावर्षी चारशे कोटींची मागणी केल्यावर पदरात फक्त 192 कोटी मिळाले त्यासंदर्भात देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन एकनाथजी शिंदे साहेब जे गरीबांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटा अशा सूचना देखील केल्या.