#

Advertisement

Saturday, July 1, 2023, July 01, 2023 WIB
Last Updated 2023-07-01T10:32:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात Love Pakistan लिहिलेल्या फुग्यांची विक्री

Advertisement

सोलापूर : सोलापुरात ईदगाह मैदानजवळ पाकिस्ताचा झेंडा आणि LOVE PAKISTAN लिहलेले फुगे विकले जात होते. बकरी ईद निमित्त नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाच्या लक्षात येताच फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे फुगे कुठून आणले यासंदर्भात चौकशी सुरु आहे. 
बाजारात हे फुगे कसे आले, कुणी तयार केले आणि होलसेल विक्री ज्यांनी केली या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएम वाहतुक आघाडीचे शहाराध्यक्ष रियाज सय्यद  यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येतात. यावेळी एक फुगेवाला लव्ह पाकिस्तान असे छापलेले फुगे विकत असल्याचं काही जणांच्या लक्षात आलं. मुस्लीम बांधवांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देत त्या फुगेवाल्याला पकडून दिलं आहे.  हा फुगेवाला अशिक्षित आहे. त्यामुळे त्याला कोणते फुगे विकत आहोत याची कल्पना नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिलीय, पण या फुगे विक्रेत्याला हे फुगे कोणी दिले, कोणत्या होलसेल विक्रेत्यांकडून त्याने हे फुगे विकत घेतले याची आता पोलीस चौकशी करत आहेत