Advertisement
नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी 30 लाखांचे घबाड सापडले आहे. नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. लाखोरीतून सुनिता धनगर यांनी कोट्यावधीची संपत्ती जमवली आहे. सुनिता धनगर यांच्या चौकशीत लाचखोरीचे रेड कार्डच तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. यानंतर आता राज्यातील अनेक लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकारी लाच लुचपत विभागाच्या रडावरआले आहेत. अनेक ठिकाणी लाच लुचपत विभागाने धाडी टाकल्या आहेत. लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांची उघड चौकशी करा असे पत्रच शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अॅन्टी करप्शनला दिले आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकार्यांच्या चौकशी होण्याची शक्यता आहे. शिक्षक, शिक्षण अधिकार्यांवर लाच लुचपत विभागाने कारवाई अथवा छापे टाकले आहेत अशा सर्वांची उघड चौकशी करा अशी मागणी करणारे पत्र शिक्षण आयुक्तांनी अॅन्टी करप्शनला दिले आहे.
