Advertisement
कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात महाराष्ट्रामध्ये मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होताना दिसत आहेत. बीआरएसने आता थेट राजू शेट्टींनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, मात्र या ऑफरला राजू शेट्टींनी साफ नकार दिला आहे.
बीआरसमध्ये पक्षप्रवेशाच्या अटीवर राजू शेट्टींनी ही ऑफर नारकाली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल आहे..दरम्यान, राजू शेट्टींनी एकला चलोचा नारा दिला आहे. यासोबतच आमच्यातल्या काही जणांना बीआरएस फोडत असल्याचा आरोपही शेट्टींनी केली आहे.
बीआरएसने मला ऑफर दिली, बीआरएसमध्ये प्रवेश करा तुम्हाला केंद्रीय कोअर कमिटीचा सदस्य करतो. तसंच महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तुम्हाला समोर आणू, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही माझा इतका विचार केला याबद्दल धन्यवाद देतो, पण, माझा कोणत्याही पक्षात जायचा विचार नाही, असं आपण त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
बीआरएसने राजू शेट्टी यांच्याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने पक्षात घेण्याची तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची ऑफर दिली होती.
