#

Advertisement

Saturday, June 24, 2023, June 24, 2023 WIB
Last Updated 2023-06-24T11:26:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"पंकजा मुंडेंना MIM ने पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती : असदुद्दीन ओवेसींचा गौप्यस्फोट

Advertisement

मुंबई :  भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमने पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदरादबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पंकजा यांना 2 वर्षांपूर्वीच पक्षप्रेवेशासंदर्भात विचारलं होतं असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
पंकजा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच होती. त्यानंतर आता के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीनेही पंकजा यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं असतानाच पंकजा यांच्याबद्दल असदुद्दीन ओवेसी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी 2 वर्षांपूर्वीच पंकजा यांना आम्ही पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती असा दावा केला आहे.