#

Advertisement

Sunday, June 18, 2023, June 18, 2023 WIB
Last Updated 2023-06-18T18:48:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मणराव ढोबळे साहेब ही आपल्या समाजाला लाभलेली शक्ती आहे !

Advertisement


 : लक्षवेधी विशेष :

वक्तृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व हे शब्द बोलणे आणि अशी संबोधने आपल्या भाषणाच्या माध्यमातून एखाद्याला देणे खूप सोपे असते. परंतु, त्याला आपल्या अंगभूत कौशल्याच्या आधारे सिद्ध करून दाखवणारे आणि झोपडीत जन्माला येऊन गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिक श्रोत्यांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्रातील एकमेव-द्वितीय नेते म्हणजे माननीय श्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब...!

- बाबा वाघमारे, महाराष्ट्र विधानमंडळ, ग्रंथपाल माहिती संशोधन अधिकारी 

.................

व्यासंगाला जेव्हा अनुभवाची जोड लाभते,तेव्हा ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतील गोडवा जसा ओवी ओवी मधून पाझरतो,अक्षरशः तसाच अमृतमय गोडवा..'ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे,' असे अभिमानाने म्हटले जाते त्या "शब्दप्रभू" ढोबळे साहेबांच्या शब्दांशब्दातून सर्व बालवृद्धांनी 'याची देही याची डोळा' अन आपण सर्व भाग्यवान आहात आदरणीय ढोबळे सरांसारखे समाजाच्या पती असलेले वेगवेगळे अंतकरणापासून योगदान देणारे दूरदृष्टीचे नेते आपल्या समाजाला लावलेली आहे हे आपले भाग्य आहे त्यांना आपण समजून घ्या. कारण सरांच्या बरोबर समाज परिवर्तन यात्रेत मी उभा महाराष्ट्र फिरलो आहे. सरांची व्याख्याने त्यांचे विचार त्यांनी दिलेली समाजाला दिव्यदृष्टी हे सगळं परमेश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे, सर हे अवतारी पुरुष हे आपल्या समाजाचे भाग्य आहे. किती जणांना मला माहित नाही, पण मी त्याचा साक्षीदार आहे अनेक ठिकाणी सरांची केलेली पेढे तुला पुस्तकांची तुला साखर तुला मीही पाहिलेल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोली पासून सिंधुदुर्ग पर्यंत सरांनी व्रत आपल्या अंगीकारण उभा महाराष्ट्र प्रभावित केला हे किती जणांना माहिती आहे मला माहित नाही पण सर हे महाराष्ट्राचे आपल्या समाजाचे आयडॉल आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठे लहुजी घराघरात पोहोचण्यासाठी जे कष्ट घेतले ते मी स्वतः पाहिले त्यांची निष्ठा त्यांचे वक्तृत्व त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते. सरस्वती पुत्र आदरणीय ढोबळे सर उद्या महाराष्ट्राला आपल्या समाजाला वेगळे दिशादर्शक आहेत, त्यांचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. ढोबळे सरांचा अभ्यास करायला पीएचडीचा अभ्यासक्रम देखील कमी पडेल. सरांचा व्यासंग समाजावर समाजमनावर अधिराज्य गाजवणारा हा मोकळ्या मनाचा पडदा बघता प्रत्येकाच्या अंत:करणात भिडणारा आपला नेता, नवी दिशा देणारा आपला मार्गदर्शक, निष्ठापूर्वक समाजाची सेवा करणारा एक समाजसेवक अशी कितीतरी विशेषन तरी ती कमीच पडतील. सरांचं कार्य हिमालयाच्या उंची हिमालयाच्या उंचीपेक्षा अधिकच आहे. सर म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र आहेत. परमेश्वरांना समाजाला दिलेली देणगी म्हणजे आदरणीय लक्ष्मण ढोबळे सर हे फक्त मी आदराने सांगू शकतो. कारण मी हे सर्व सरांच्या बरोबर महाराष्ट्र पाहिलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेचा एक जबाबदार अधिकारी म्हणून मी ह्या गोष्टी सरांच्या सोबत पाहिलेले आहेत. आपल्या समाजाला समजाव्यात म्हणून केवळ फक्त प्रत्येकापर्यंत पोहोचावेत सरांचं कर्तृत्व समजावं ढोबळे सर ही व्यक्ती नसून आपल्या समाजाची शक्ती आहे हे लक्षात यावं म्हणूनच मी आपल्यापुढे हे माझं विवेचन अनेक वर्ष नंतर मी हे सर्व पाहिल्यानंतर व्यक्त करीत आहे. सरांच्या पोटी माझं खरं प्रेम आहेच. पण समाजासाठी जे सरांनी केलेले आहे त्याचा मी साक्षीदार आहे. मी सरांचा एक निश्चित भक्त आहे. मित्र आहे आणि सरांचा चाहता आहे. आपण सर्वांनी सरांच्या सर्व भूमिकाचा आदर करावा आणि समाजाची नवसंजीवनी असणाऱ्या सरांचा आदर्श सर्वांनी जोपासवा. एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सरांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्यातून आणखी समाजाची सेवा घडो. समाजाला सर समजावेत आणि सरांच्या बुद्धीची उंची समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.