#

Advertisement

Saturday, June 24, 2023, June 24, 2023 WIB
Last Updated 2023-06-24T11:16:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा

Advertisement

 

मुंबई : राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे. 10 वर्ष जुन्या 1 हजार  कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जात असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रकमा वळत्या केल्याचा ईडीला संशय आहे. या घोटाळ्यात बँकेचे अधिकारी असल्याचा आरोप आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक असल्याचा आरोपही केला जात आहे.. याबाबत जयंत पाटलांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेल नाही.
सांगलीमध्ये ईडीने एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत. आर्थिक अनियमिततेच्या कारणामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. या पाच व्यापाऱ्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे.