#

Advertisement

Saturday, July 22, 2023, July 22, 2023 WIB
Last Updated 2023-07-22T16:06:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड

Advertisement

नागपुर : ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका व्यावसायिकाची लोकांची 58 कोटी रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. आरोपीने ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कामविण्याचे आमिष दाखवले होते. केसिनो, रमी, तीन पत्ते, क्रिकेट अशा प्रकारच्या गेम खेळून पैसे कमावण्याचे आमिष लोकांना दिले. गोंदियाच्या अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या अ‍ॅपच्या लिंकमध्ये सेटिंग मॅन्युपुलेट केलेली होती. 'डॉक्टर्ड' अ‍ॅप अशा पद्धतीने तयार केले होते की त्यात खेळणारा हरत जातो. या प्रकरणातील आरोपी फरार असून तो दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. आरोपीच्या घरातून 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या अ‍ॅपची लिंक केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.