Advertisement
मणिपूर : कुकी समाजातील दोन तरुणींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्य दाखवलं नसल्याचा आरोप केला जातआहे. जमावाने या तरुणींवर अत्याचार करत त्यांची हत्या केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार घडला होता. मणिपूरच्या खांगपोकी जिल्ह्यातल्या बी फैनोम गावात दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनास्थळापासून 40 किलोमीटर दूर इंफाळमधल्या कोनुंग ममांग इथं हा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत 21 आणि 24 वर्षांच्या दोन तरुणींना जमावाने लक्ष्य केलं. या दोन तरुणींवर काही महिला आणि पुरुषांच्या जमावाने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार जमावातील महिलांनी त्या दोन तरुणींवर अत्याचार करण्यासाठ पुरुषांना प्रोत्साहित केलं. त्यानंतर पुरुषांनी त्या दोन्ही तरुणींना एक बंद खोलीत नेलं. त्या ओरडू नयेत यासाठी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला. या सर्व गोष्टींसाठी जमावातील महिलाही पुरुषांना मदत करत होत्या. जवळपास दीड तासांनी त्या मुलींनी घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानतंर त्यांना रस्त्यावर फेकून दिलं. त्या तरुणींचे कपडे पूर्णपण फाटले होते आणि शरीरातून रक्त वहात होतं. त्या मुलींचे केसही कापण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर जमावाने त्या दोनही मुलींची निर्घृण हत्या केली.
