#

Advertisement

Friday, July 28, 2023, July 28, 2023 WIB
Last Updated 2023-07-28T11:12:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कचरा वेचणाऱ्या महिलांनी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट

Advertisement

केरळ : मल्लापूरम येथे कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीबच पालटलं आहे. 11 महिलांना एका रात्रीत 10 कोटींचा जॅकपॉट लागला आहे. विशेष म्हणजे या महिलांनी पैसे गोळा करुन 250 रुपयांचं हे तिकीट खरेदी केलं होतं.   केरळमधील 11 महिलांकडे लॉटरीचं तिकीट खरेदी कऱण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी या 250 रुपये देखील नव्हते. महिलांनी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्या खिशात 25 रुपयेदेखील नव्हते.
केरळच्या परप्पनंगडी नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या हरित सेनेत या 11 महिला कचरा गोळा करण्याचं काम करतात. आपण करोडपती होऊ असा विचार या महिलांनी स्वप्नातही केला नसेल. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ड्रॉनंतर केरळ लॉटरी विभागाने त्यांना 10 कोटींच्या मॉन्सून बंपरचं विजेता घोषित केलं.  आपल्या सहकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्यानंतर तिकीट खरेदी करणाऱ्या राधाने सांगितलं की, "आम्ही याआधीही पैसे गोळा करत तिकीट खरेदी केलं होतं. पण पहिल्यांदाच आम्हाला इतकी मोठी रक्कम पुरस्कारात मिळाली आहे". दुसऱ्या महिलेने सांगितलं आहे की, आम्ही फार आतुरतेने या निकालाची वाट पाहत होतो. पण जेव्हा आम्हाला पलक्कड येथे विकण्यात आलेल्या तिकीटाला पहिला पुरस्कार मिळाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा वाईट वाटलं होतं.
पण जेव्हा आम्हाला जॅकपॉल लागला आहे समजलं तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही सर्वजण आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करत आहोत. पैसा आल्याने आमच्या या समस्या बऱ्यापैकी कमी होतील". या महिलांचं वेतन फार कम असून, अनेकजणी कुटुंबातील एकमेक कमावत्या आहेत. अशा स्थितीत हा पैसा त्यांच्यासाठी फार मोठा आधार आहे. 

हरिता कर्म सेना घरं आणि आस्थापनांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा उचलतात, जो श्रेडिंग युनिट्समध्ये पुनर्वापरासाठी पाठवला जातो. नगरपालिकेतील हरित कर्म सेना संघाच्या अध्यक्षा शीजा म्हणाल्या की, यावेळी नशिबाने सर्वाधिक पात्र महिलांना साथ दिली. सर्व विजेत्या खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे एकमेव साधन आहेत.