#

Advertisement

Thursday, July 27, 2023, July 27, 2023 WIB
Last Updated 2023-07-27T11:34:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविली समाजभावना

Advertisement

 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवसाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी

मुंबई : समाजाच्या अडचणी तसेच भावना यांची जाण असलेले लोकनेतृत्त्व म्हणून माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव सातत्याने का घेतले जाते याचा प्रत्यय पुन्हा समाजबांधवांना आला. समाजाकडून होणारी मागणी ढोबळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. यावेळी त्यांच्यासमवेत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात माजीमंत्री ढोबळे यांनी म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची यावर्षी 103वी जयंती साजरी होत आहे. अण्णा भाऊ साठे यांना दैवत मानणारा मातंग समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. या समाजाच्या वतीने दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व समाजबांधव एकत्र येतात. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हा फक्‍त उत्सव नसून तो लोकोत्सव बनला आहे, असा हा लोकोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री 12:00 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, अशा मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले असून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे ऍड. कोमलताई यांनी सांगितले.