Advertisement
मुंबई : पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचाराबाबत आमदार राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्यानं हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत होता. या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहीलं होतं. मात्र या प्रकरणात राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
