Advertisement
मुंबई : कोळसा खाण वाटप गैरव्यवहारात दोषी ठरलेले राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे\ दिल्लीच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला आहे. याप्रकरणी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही चार वर्षांची शिक्षा झाली. तर माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यानाही तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमधल्या कोळसा खाणींच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात या सर्वांना दोषी ठरवण्यात आलं होत.
