#

Advertisement

Wednesday, July 26, 2023, July 26, 2023 WIB
Last Updated 2023-07-26T16:46:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निधी वाटपात अन्याय : काँग्रेसचा न्यायालयात जाण्याचा इशारा

Advertisement

मुंबई :  आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय करण्यात आरोपा काँग्रेसने केला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास निधी नाही दिला तर मात्र काँग्रेस न्यायालयात धाव घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले यांनी निधी वाटपात असमानता झाल्याचा आरोप केला. काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळाला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंजूर केलेल्या विकास कामांना सरकारने स्थगिती दिलेली आहे ती स्थगितीही उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे.