Advertisement
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. अजित पवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.. त्यामुळे शरद पवार गट यावर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे. मात्र यानिमित्तानं आता राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष निवडणूक आयोगासमोर सुरू झाला आहे.
