#

Advertisement

Monday, July 17, 2023, July 17, 2023 WIB
Last Updated 2023-07-17T10:25:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अधिवेशनाला शरद पवार गटाचे 9 चं आमदार उपस्थित

Advertisement

मुंबई :  आधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे एकूण 15 आमदार उपस्थित होते, तर शरद पवार गटाच्या 9 आमदारांनी हजेरी लावली.
राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत, त्यापैकी अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर नवाब मलिक हे तुरुंगात असल्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट नाही. उर्वरीत  आमदारांपैकी 32 आमदारंनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर 14 आमदार शरद पवार यांच्या गटात आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज अजित पवार गटाचे 15 तर शरद पवार यांच्या गटाचे एकूण 9 आमदार उपस्थित होते.