Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदार भेटायला का पोहोचले याबद्दल माहिती दिली आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 'असं आहे की, सर्व आमदार हे शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे सर्व आमदार हे भेटायला गेले. आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहोत. आमचे ते नेते आहे, ते कायम नेते राहणार आहे. आम्ही सगळे एकाच पक्षात राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. अशातच रविवारी अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. तर आज अधिवेशनाचं काम कामकाज संपल्यानंतर सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सर्व आमदार दाखल झाले आहे. काल रविवारी अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते.
