#

Advertisement

Tuesday, July 18, 2023, July 18, 2023 WIB
Last Updated 2023-07-18T12:19:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंत्रालयात आजी-माजी शिक्षणमंत्री आले एकत्र

Advertisement



 

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिल्या दीपक केसरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यातील राजकीय स्थितीत अनेक स्थित्यंतरे झालेली असताना सत्ताधारी, विरोधी अशा राजकीय उपाध्या बाजुला ठेऊन माजी शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या शिक्षणमंत्री पदी शिंदे गटाचे दिपक केसरकर कामकाज पाहत आहेत. त्यांचा वाढदिवस असल्याचे समजातच मंत्रालयात मतदार संघातील काम घेऊन आलेले माजी शिक्षणमंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे तातडीने पुष्पगुच्छ घेऊन केसरकर यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या दोन्ही आजी-माजी शिक्षणमंत्र्यामध्ये सध्याच्या राजकीय शिक्षण क्षेत्राच्या स्थितीसह शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती, बदलता अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा कल या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात करावे लागणारे बदल आदी मुद्यांवर केसरकर आणि ढोबळे यांनी चर्चा केली. यावेळी ढोबळे यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.