#

Advertisement

Saturday, July 1, 2023, July 01, 2023 WIB
Last Updated 2023-07-01T11:06:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मातंग समाजासाठीची शैक्षणिक कर्ज योजना सुरू करा

Advertisement


बहुजन रयत परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : महामंडळाकडून उच्च शैक्षणिक कर्ज 2015 पासून बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाजातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थीनी च.इ.इ.ड. व इ.इ.ऊ.ड. इंजिनिअरींग इत्यादी शैक्षणिक खासगी संस्थेकडे फी भरण्याची आर्थिक कुवत कुंटुंबाकडे नसल्यामुळे सदर शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे शैक्षणिक कर्ज तत्काळ अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून सुरू करण्यात यावे. महाराष्ट्रातील मातंग समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी नांदेड बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष साहेबराव गुंडीले यांनी केली आहे.
नांदेड येथे यांच्या साहेबराव गुंडीले नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मुद्यावर आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई, यांच्याद्वारे एन.एस.एफ.डी.सी. दिल्ली या योजनेस महाराष्ट्र शासनाने एक हजार कोटी रुपये खंड हमी घेऊन एन.एस.एफ.डी.सी. व शैक्षणिक कर्ज योजना पुर्ववत सुरू करावी.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड या विभागात आर्थिक गैरव्यवहारातून अपंग प्रमाणपत्र बोगसरित्या दिले जात असल्याची तक्रारही बहुजन रयत परिषदेच्यावतीने गुंडीले यांनी मुंबई आरोग्य आयुक्‍तांकडे केली आहे. तसेच,
जिल्हा शल्य चिकित्सक गुरू गोविंदसिंघजी रूग्णालय, नांदेड या विभागातून आर्थिक गैरव्यवहारातून अपंग प्रमाणपत्र दिले जात आहे. लाभधारक विद्यार्थी अपंग असल्याचे दाखवून एम.बी.बी.एस.ला प्रवेश पात्र ठरत आहेत, असे अनेक खोटे प्रमाणपत्रधारक शासनाची दिशाभूल करून लाभ घेत असल्याचे गुंडीले यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे.