#

Advertisement

Monday, July 10, 2023, July 10, 2023 WIB
Last Updated 2023-07-10T12:03:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार-अजितदादा एकाच व्यासपीठावर येणार?

Advertisement

पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 1 ऑगस्टला पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक यांच्याहस्ते हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे, पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्य फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येऊ शकतात.