#

Advertisement

Tuesday, July 18, 2023, July 18, 2023 WIB
Last Updated 2023-07-18T12:29:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

UPA नाही तर आता INDIA असणार विरोधकांच्या आघाडीचं नाव !

Advertisement

बंगळुरू : बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीत आघाडीच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance)असल्याचं सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं, ज्यावर बहुतेक विरोधकांनी सहमती दर्शवली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या नावाबाबत अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, पण बहुतेक पक्षांनी या नावाचं समर्थन केलं आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपच्याविरुद्ध सगळे विरोधक एकत्र यायचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. याआधी जून महिन्यात बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक झाली होती.