Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष संघटना, राज्यातील गाव, वाडी वस्ती पातळीवर मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
तसंच शिवसेना पक्ष कार्यकारिणीने राज्यातील जिल्हा निहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करत आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
