#

Advertisement

Wednesday, July 5, 2023, July 05, 2023 WIB
Last Updated 2023-07-05T10:34:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बापाला घरी बसवून आशीर्वाद द्या म्हणायचं का?

Advertisement

मुंबई : 'काही लोकांचं वय झालंय त्यामुळे त्यांनी आशिर्वाद द्यावेत, असं काही जण म्हणाले. का बरं आशिर्वाद द्यावेत. रतन टाटाचं वय काय, सीरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय 84 घेतलं का नाही इंजक्शन. अमिताभ बच्चन वय काय 82. फारुक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्ष मोठा आहे. आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना फटकारलं.
अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावलं. 
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी...हा बाप एकट्या लेकीचा नाही. तुम्हा सगळ्यांचा आहे. बाप आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला. पण बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ...एक सांगते,  मला अजून लढायचं आहे. ज्यांनी मन घट केले, त्यांचे आणखी आभार होता, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजितदादांसह बंडखोरांना टोला लगावला.