#

Advertisement

Thursday, July 6, 2023, July 06, 2023 WIB
Last Updated 2023-07-06T10:27:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Advertisement


नवी दिल्ली :  पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा प्रतिक्रिया दिली नाही.
काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे साठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं सोशल मीडियावर दिसत होतं. त्यामुळे आता ह्या चर्चा जास्त जोर धरु लागल्या आहेत. शिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर तर सर्वांनाच ज्ञात आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.