#

Advertisement

Friday, July 21, 2023, July 21, 2023 WIB
Last Updated 2023-07-21T11:28:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"लोकनेता' असावा तर प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासारखा...

Advertisement

मंत्रालयासह प्रशासकीय कामावर चांगली पकड; हजारो नागरिकांची कामे मार्गी


सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून वेगवेळी नावे चर्चीली जात असताना लोकनेता कसा असावा तर प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सारखा, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्यातील तळागळातील नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. याचे कारणही तसेच आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2019 पासून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ढोबळे हे सर्व सामान्य कार्यकर्ते, जनतेचे प्रश्‍न शासन दरबारी सोडवित आहेत. ढोबळे यांच्याकडे काम घेऊन गेले की काम होणारच, अशी भावना सामान्यातील सामान्य नागरिकामध्ये त्यांच्याविषयी निर्माण झाली आहे. याच कारणातून लोकसभेसाठी ढोबळे हेच उमेदवार असावेत, अशी तीव्र इच्छा पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिकांकडूनही व्यक्‍त होत आहे.
राजकारणाचा कोणताही वारसा नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून शरद पवार यांच्या सहकार्याने ढोबळे यांनी राजकारणात मोठी मजल मारली आहे. तब्बल 25 वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांनी काम केले आहे. 2004 पर्यंत ते मंगळवेढ्याचे आमदार होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडले, आज ते भाजपमध्ये निष्ठावान म्हणून कार्यरत आहेत. 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. ढोबळे यांच्या मतदार संघात भाजपने मतदानात मोठी आघाडी घेतल्याची नोंद आहे. त्यानंतरही कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा ढोबळे यांनी ठेवली नाही. आजही मतदार संघासह सोलापूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नी ते काम करीत आहेत. याची प्रचिती सातत्याने येत आहे. ढोबळे यांनी मंत्रीपदासह मोठ्या कालावधीत विधानसभेचे कामकाज केले आहे. यातून त्यांची प्रशासकीय पकड आजही घट्ट आहे. मंत्रालयातील अधिकारी बदलून गेले तरी तेथील कार्यपद्धतीची चांगली जाण असल्याने आजच्या लोकप्रतिनिधींकडून होत नाहीत, अशी जनतेची कामे ढोबळे यांनी सहज मार्गी लावातात. त्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका पाहता, असाच लोकप्रतिनीधी सोलापूरसाठी असावा, अशी सहज प्रतिक्रिया मतदार संघातून उमटत आहे.

ढोबळे साहेब स्वत: मंत्रालयात येतात...
माजी मंत्री लक्ष्णराव ढोबळे यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले की ते जागेवरूनच फोनाफोनी करून करण्यापेक्षा संबंधीत नागरिक, कार्यकर्त्यांसह ते मंत्रालयातील सदर विभागात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतात तसेच त्यामध्ये काही अडचणी असतील तर संबंधीत खात्याच्या मंत्र्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांना त्या कामात येणारी अडचणही दूर करतात. जोपर्यंत आपल्या भागातील सामान्य नागरिकाचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत ते मंत्रालयातील संबंधीत अधिकाऱ्यांकडे फॉलप घेत असतात, याच कारणातून त्यांच्या कामाबाबत अनेकांनी समाधान वक्‍त केले आहे.