Advertisement
मुंबई : ठाकरे गटातून नीलम गोऱ्हे यांनीशिवसेनेत प्रवेश केला. गोऱ्हे यांच्यापूर्वी मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. कांयदे यांनी पक्षात प्रवेश करताच शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करावं अशी मागणी ठकरे गटाकडून करण्यात आली आहे.
नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना पत्र देण्यात आलं आहे. आता या पत्राला पुढील चौदा दिवसांच्या आता गोऱ्हे आणि कायंदे यांना उत्तर द्यावं लागणार आहे.
