#

Advertisement

Friday, July 21, 2023, July 21, 2023 WIB
Last Updated 2023-07-21T12:22:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही?

Advertisement

 मुंबई  : पावसाळी अधिवेशन सुरू होऊन, एक आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाही. विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन सुरू आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं विरोधीपक्ष नेतेपदावर  काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाहीये, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे. कोण कुठे जाईल असा त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. विरोधी पक्षामध्ये एकी दिसत नाही. वर्षभरात किती नेते काँग्रेसमध्ये राहातात आणि किती जण पक्ष सोडतात असं त्यांना संशय आहे. पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडे किती नेते राहातील हे सांगता येत नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.