Advertisement
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी असून उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले असून पदासाठी लागणारी पात्रता, रिक्त जागा, पगार, मुलाखतीचा पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सिनीअर रेसिडेंशियल पदाच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे संबंधित विषयातील डिग्री/एमडी /एमएस / DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतचउमेदवाराकजे एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार 250 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
