Advertisement
दिल्ली : भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या (NDA) बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
दिल्लीत आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर सकाळी 11 वाजल्यानंतर ही भेट झाली. जवळपास एक तास मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, पत्नी, सून, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ही भेट झाली. आमच्या कुटुंबाची इच्छा होती की पंतप्रधान मोदींची सचिच्छा भेट घ्यावी, सर्वांनी भेट घेतली. सर्वांना समाधान वाटलं, मोदीजींनी खूप वेळ दिला असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटल आहे.

