Advertisement
दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी गेले असताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना सौम्य झटका आला. यानंतर जाधव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते. नवी दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटल मध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी मार्च महिन्यात भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय. लोकसभेला त्यांनी लाखो मते मिळवली होती. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना पराभवाचा धक्का बसला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.
हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये एन्ट्री केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला होता.
