Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया त्यांच्या हाताशी संबंधित होती. प्रतिभा पवार यांच्यावर आजच ब्रीज काँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये 'काकी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिभा पवार यांच्याकडे पक्षाचे पालक म्हणून पाहिले जाते. प्रतिभा पवार राजकारणात नसून 2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना परत आणण्यात प्रतिभा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याचा उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात प्रतिभा पवार आणि अजित पवार यांच्यात अतुट नातं असल्याचे लिहिले आहे.
