#

Advertisement

Wednesday, July 26, 2023, July 26, 2023 WIB
Last Updated 2023-07-27T04:43:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि वातावरणही आरोग्यदायी : डॉ. एस.एस. माळी

Advertisement


मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी 

तुळजापूर : मंगरूळ (ता. तुळजापूर) येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि वातावरण आरोग्यदायी असल्याचे प्रतिपादन मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ. एस.एस. माळी यांनी केले.

शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व संचालिका कोमलताई साळुंखे- ढोबळे यांच्या सूचनेनुसार दि,22 जुलैला मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर यांनी आश्रम शाळेत आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी डॉ.  माळी बोलत होते. 

यावेळी मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. माळी यांच्यासह डॉ.  एस. एम.जेटीथोर मॅडम तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. सर्व विद्यार्थी आरोग्य संपन्न असल्याच्या नोंदी घेण्यात आल्या. यावेळी योग्य स्वच्छ्ता, आहार तसेच खेळ आणि व्यायाम या विषयी डॉ. माळी आणि डॉ. जेटीथोर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक क्षिरसागर यांनी आभार व्यक्त केले. प्रार्थना तसेच अल्पोपहारनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.