#

Advertisement

Saturday, July 22, 2023, July 22, 2023 WIB
Last Updated 2023-07-22T19:16:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांची खासदारकी जाणार ?

Advertisement

 


जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा सुनावणी होणार

सोलापूर : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर सोलापूर पडताळणी समितीला मिळाली आहे. यामध्ये सत्यता आढळून आल्यास जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी ही रद्द होऊ शकते, अशी चर्चा आहे.

दि. २८ जुलैला समितीचे सदस्य खासदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीची कार्यवाही सुरु करणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 

बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर समितीने दक्षता पथक नेमून खासदारांच्या मूळ गावापासून प्रमाणपत्र दिलेल्या तहसील कार्यालयापर्यंतची सर्व कागदपत्रे पडताळून पाहिली. सुनावणीअंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार अक्कलकोट तहसीलदारांच्या माध्यमातून खासदार डॉ. महास्वामींविरूद्ध कलम '४२०'अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला. त्यावर डॉ. महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वी त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत या जात पडताळणी प्रकरणी फेर तपासणी करून समितीने निकाल द्यावा, असे आदेश दिले. त्यानुसार आता पुन्हा जात पडताळणी समितीचे कामकाज सुरु झाले आहे. त्यामुळे आता खासदारांना पुन्हा त्यासंदर्भातील सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. यातून त्यांच्या अडचणी वाढू शकतात.